LIVE UPDATES

१० वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

Edited by:
Published on: September 05, 2025 15:08 PM
views 979  views

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला सुन्न करून गेली. अवघ्या दहा वर्षांच्या श्रावण अजित गावडे या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.  अधिक वेदनादायक बाब म्हणजे,  श्रावणने आपला अखेरचा श्वास आपल्या आईच्या मांडीवर घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की,  आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणाऱ्या गावडे कुटुंबातील श्रावण बुधवारी संध्याकाळी गणेश मंडळाच्या शेडमध्ये मित्रांसोबत खेळत होता. तो नेहमीप्रमाणेच हसत-खेळत होता. मात्र, काही क्षणांतच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो धावत घराकडे गेला आणि थेट आईच्या मांडीवर जाऊन विसावला.   आईच्या कुशीत डोके ठेवून तो काहीतरी सांगू पाहत होता,  पण क्षणार्धात त्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि आईच्या मांडीवरच त्याने डोळे मिटले. 


श्रावणच्या आईने टाकलेला आर्त हंबरडा आणि मदतीसाठीची धडपड पाहून शेजारी धावून आले. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हा मृत्यू अचानक आलेल्या हृदयविकारामुळे झाला.  


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026