LIVE UPDATES

चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या भव्य नव्या प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
Edited by: ब्युरो
Published on: January 27, 2023 20:15 PM
views 494  views

कोल्हापूर : फूड इंडस्ट्रीजमध्ये राज्यभर परिचित असलेले चकाेते ग्रुप ऑफ इंडस्ट्री आता नव्या क्षितीजापलीकडे वाटचाल करीत आहे. नांदणी, काेल्हापूरसह राज्यभर अनेकांच्या हृदयात वसलेल्या चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या नव्या प्रकल्पाचे शानदार उद्घाटन शनिवारी (दि. २८) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. शनिवारी दुपारी १२.३० वाजता नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी फूड क्लस्टरमध्ये हा सोहळा होत आहे. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तर शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांनी दिली.

चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते म्हणाले, गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य असल्याचे मला जाणवले आणि या प्रकल्पाची बांधणी झाली. अतिशय प्रतिकूल अशा कोरोना काळातदेखील प्रत्येक टप्प्यावर विविध संकटांवर मात करत चकोते ग्रुपने या प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा प्रकल्प नांदणी येथील स्वाभिमानी फूड  पार्कमधील तेरा एकर जागेमध्ये आणि अडीच लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास खा. धनंजय महाडिक, धैर्यशील माने, संजय मंडलिक, संजय पाटील, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आ. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, राजू आवळे, राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर व एच. के. बत्रा यांसह आजी-माजी खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीचा स्टाफ, कामगार व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांतील सर्व वितरक, रिटेलर्स उपस्थित राहणार आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026