LIVE UPDATES

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण | तीन आठवड्यात CBI भूमिका स्पष्ट करणार

32 पैकी 15 साक्षीदारांची साक्ष आली नोंदवण्यात
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 30, 2023 16:28 PM
views 576  views

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.


डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज ( ३० जानेवारी ) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा अनिल सिंग यांनी सांगितलं की, “डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी तपास करण्याची गरज नाही. दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात तपासाचा अहवाल पाठवण्यात आला आहे. यावर तीन आठवड्यांत सीबीआय आपला निर्णय जाहीर करेल,” असं सिंग म्हणाले.


तसेच, याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले असून, पुणे सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने तपासावर आता देखरेख ठेऊ नये, अशी मागणी आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनी न्यायालयात केली. याला दाभोलकर कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी विरोध दर्शवला. “दाभोलकर हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. हत्येसाठी वापरलेली दुचाकी आणि हत्यार सापडलेले नाही. हत्येचं कारण समोर आलं नसून, सूत्रधारचा शोध लागला नाही. त्यामुळे याप्रकरणात उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक आहे,” असं नेवगी यांनी म्हटलं.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026