LIVE UPDATES

CRIME | विषय कराडचा, खळबळ सिंधुदुर्गात | 'त्या' घटनेमागचं सत्य काय ?

घातपात करायला गेला अन् स्वतःही मेला !
Edited by: काका भिसे
Published on: January 31, 2023 19:27 PM
views 999  views

आंबोली : दरीत कोसळलेल्या युवकाच्या घटनेमागील एक धक्कादायक एखाद्या सिनेमातील सीनसारखी घटना समोर आली आहे. कराड येथील वीट व्यावसायिकांमधल्या वादाची पार्श्वभूमी या घटनेला असून या वादातून दोन जीव गेल्याचा हा प्रकार आंबोलीत घडला आहे. 

कराड येथील वीट व्यावसायिकानं एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला गाडीत घालून संबंधितांनी मारहाण केली. यावेळी त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन त्याचा मुर्त्यू झाल्याच मारणाऱ्या व्यक्ती पैकी एकाच म्हणन आहे. दरम्यान, देणेकरी  मेल्यानं घाबरून आम्ही आंबोली गाठली. यावेळी घाटात त्या देणेकरी व्यक्तीचा मृतदेह टाकत असताना तो व्यक्ती ज्याचे पैसे देण लागत होत त्या व्यक्तीचा देखील पाय सटकून दोघे दरीत कोसळले. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. यात दोघांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या व्यक्तींन ही माहिती पोलीसांना दिली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ह्या घटनेमागच नेमक सत्य शोधून काढण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे.


कराड येथील दोन मित्रांमध्ये देवघवीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारी व त्यानंतर खून असे झाल्यामुळे नाट्यमयरीत्या आंबोली घाटामध्ये मिळालेले दोन मृतदेह यामुळे या दुहेरी हत्याकांडाला नाट्यमय  वळण मिळाले आहे‌. कराड येथील दोन मित्रांमध्ये वीट कामगारांचा पुरवठा करण्यावरून आर्थिक व्यवहार झाले. जी रक्कम काही लाखांमध्ये होती ही रक्कम भाऊसो अरुण माने वय 30 राहणार कराड याने सुशांत खिल्लारे व 28 याला दिले होते. परंतु, वर्षभर तो पैसे व सांगितलेले कामही करत नसल्याने भाऊसो यांनी आपला मित्र तुषार पवार यांच्यासोबत सुशांत खिल्लारे याला कराड येथे निर्जनस्थळी बोलावून घेतले व आपल्या व्यवहाराचे काय झाले असे विचारणा केली. तसेच त्याला मारहाण केली. तुषार पवार (वय 28) व भाऊसो माने यांनी सुशांत याला बेदम मारहाण केली. यात सुशांत याचा मृत्यू झाला. याच परिस्थितीत दोघेही घाबरल्यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली गाठण्याचे ठरवले व ते कराडहुन आंबोली घाटात पोहोचले.


आंबोली घाटातील मुख्य धबधबा पासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्रीच्या अंधारात म्हणजे आठ वाजताच्या सुमारास मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर काढला व संरक्षक कठड्यावर उभे राहिले. सध्या स्थितीत पर्यटन हंगाम कमी असल्यामुळे रस्त्यावर म्हणावे तितकी वाहतूकही नव्हती याचा फायदा घेत त्यांनी मृतदेह फेकण्यासाठी कठड्यावर उभे राहिले. परंतु यावेळी नेमका मृतदेह फेकताना सुशांतचा मृतदेह तर खाली फेकला गेलाच परंतु त्याच वेळेस तोल गेल्याने भाऊसो माने सुद्धा दरीमध्ये कोसळला. परंतु तुषार मात्र यातून बचावला त्याने स्वतःला सावरले व तो वरच राहिला, तुषार याने आपला मित्र भाऊसो याला हाका मारल्या. परंतु कोणताही उपयोग झाला नाही. तुषार याने चालू असलेली गाडी तशीच पुढे पूर्वीचा वस मंदिर येथे आणली व गाडी बंद केली. यानंतर तुषार यांनी घडलेला प्रकार भाऊसो याच्या नातेवाईकांना सांगितला.  त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना खबर दिली. 



मंगळवारी दुपारी एक वाजता च्या सुमारास आंबोली पोलिसांना याबाबत कराड पोलिसांकडून खबर देण्यात आल्यानंतर तात्काळ आंबोली पोलीस व आंबोली रेस्क्यू टीम मार्फत घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळी शोधत असताना रेस्क्यू टीमला दोन मृतदेह आढळून आले सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही मृतदेहांना वर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले आहेत. 


यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई पोलीस कॉन्स्टेबल दीपक नाईक दीपक शिंदे, दर्शन सावंत, श्री.पाटील तसेच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा उत्तम नार्वेकर हेमंत नार्वेकर विशाल बांदेकर संतोष पालेकर राजू राऊळ अजित नार्वेकर आदी उपस्थित होते


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026