LIVE UPDATES

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा निधी...कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची तत्परता | आंगणेवाडीचे रस्ते खड्डेमुक्त !

तब्बल 18 कोटी खर्चून केले 83 किलोमीटरचे 9 रस्ते
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 01, 2023 12:19 PM
views 813  views

कणकवली : कोकणचे आराध्य दैवत असलेल्या भराडी देवीच्या जत्रोत्सवासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज झाला आहे. आंगणेवाडीला जोडणारे नऊ रस्ते १८ कोटी रुपयांचे खर्च करून डांबरीकरण करण्यात आले आहेत. त्यामुळे आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेचा प्रवास विनासायास आणि खड्डे मुक्त होणार आहे.



त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे रस्ते विकसित करण्यासाठी निधी दिला. तर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठक घेत आवश्यकत्या सूचना दिल्या होत्या. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा भराडी देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणारे हे रस्ते सुस्थितीत व्हावेत यासाठी मागणी केली होती. तर सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तत्परता दाखवत विकास कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून ही कामे पूर्ण केली आहेत.


आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेला लाखो भाविकांची गर्दी असते. या यात्रेत सर्व भाविकांना सहभागी होणे शक्य व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाने युद्धपातळीवर कामे पूर्ण केली आहेत. ८३ किलोमीटरचे रस्ते ज्यात, काळसे कट्टा प्रमुख जिल्हा मार्ग, मालवण बेळणा रस्ता , गोळवन पोईप रस्ता, ओझर कांदळगाव,मागवणे, मसुरे बांधिवडे आडवली भटवाडी रस्ता, राठिवडे हिवाळे,ओवळीये,कसालल,रस्ता,ओसरगाव,रस्ता,चौके, धामापूर, रस्ता, कुमासे, नांदोस तिरवडे, सावरवाड रस्ता, चौके, आमडोस, मळगाव, मसुरे ,देऊळवाडी ,आंगणेवाडी रस्ता बिळवस आंगणेवाडी रस्ता  असे ८३ किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण करून सुसज्ज करण्यात आले आहे.


याव्यतिरिक्त 25 शौचालय महिलांसाठी तर 25 पुरुषांसाठी आणि प्रत्येक एसटी स्टँडवर  स्त्रियांसाठी 10  शौचालय व पुरुषांसाठी 10 शौचालय ठेवण्यात आली आहेत. कायमस्वरूपी दोन कोटी रुपयांची शौचालय व स्वच्छतागृह आंगणेवाडी येथे बांधली जाणार आहेत. त्याला मान्यता मिळालेली आहे. तसेच भविष्यात सिंधुदुर्गातील रेल्वे स्टेशन आवारातील परिसर अद्यावत होणार आहे. जिल्ह्यात असणाऱ्या धार्मिक स्थळांना केंद्रीय स्तराकडून निधी प्राप्त झाल्यावर त्यांच्या सूशोभीकरणासाठी सुरुवात करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026