LIVE UPDATES

युवतीचे फेक अकाऊंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 14, 2025 19:15 PM
views 302  views

कणकवली : इंस्टाग्रामवर युवतीच्या नावे फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे युवतीलाच अश्लील मेसेज केल्याप्रकरणी राजेश्वर रामदास टारपे (२९, रा. नाटळ - सुतारवाडी) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदरची घटना ८ सप्टेंबरला उघडकीस आली होती. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सदरचा प्रकार राजेश्वर यानेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यांमध्ये कमी शिक्षा असल्याने अटक करता येत नाही. त्यामुळे राजेश्वर याला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. राजेश्वर हा गोव्यामध्ये हाउसकीपिंगचे काम करायचा, असेही पोलिसांनी सांगितले.