LIVE UPDATES

आताच तंबाखू खाणंं थांबवा | अशी भयानक अवस्था तुमचीही होऊ शकते

Edited by:
Published on: July 19, 2022 17:55 PM
views 1  views

ब्युरो :

आज जागतिक तंबाखूविरोधी दिन...यानिमित्ताने भारतातील एका प्रसिद्ध वाळूशिल्पकाराने साकारलेले वाळू शिल्प वास्तव दाखवणार आहे. तंबाखूचा शरीरावर कसा परिणाम होतो ?, तंबाखूमुळे जीवन कसं संपत ?, हे वास्तव दाखवणार हे शिल्प आहे. तंबाखू विरोधी जनजागृती करणार हे वाळू शिल्प सोशल मिडीयावर व्हायरल होतंय.

काय आहे वाळू शिल्प ? 

तंबाखू विरोधी हे वाळूशिल्प सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल होतंय. मानवी हाडाचा सांगाडा सिगारेच्या अर्धवट जळलेल्या थोटक्यावर ठेवलेला आहे. अगदी हुबेहूब त्यातील बारकावे साकारलेले आहेत. सांगाडा आणि सिगारेट खरेच असावे असा भास होतोय. तंबाखू, तंबाखूजन्यपदार्थ कसं आयुष्य संपवत हेच दाखवणार हे वाळू शिल्प आहे.

https://twitter.com/sudarsansand/status/1531475831335161856

 

 वाळू शिल्प साकारणारे वाळूशिल्पकार कोण आहेत ?  

भारताचे प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी हे वाळूशिल्प साकारलंय. या कलेतील त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांना 2014 में भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना सन्मानित केलंय. मुळचे ओडिशा राज्याचे असलेल्या सुदर्शन पटनायक यांचे वाळूशिल्प नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधतात. त्यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केलेले वाळूशिल्प अवघ्या काही तासातच व्हायरल झालेत. हजारोंनी या वाळूशिल्पाला LIKE मिळालेत.

कलाकार नेहमीच आपल्या कलाकृतीतून वास्तव मांडत असतो. समाजप्रबोधनाचं काम करत असतो आणि नेमकं हाच प्रयत्न प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी केलाय. आता याच तंबाखूविरोधी दिनी तंबाखू खाणाऱ्यांनी यातून बोध घेऊन वेळीच सावध व्हावं हीच अपेक्षा....