LIVE UPDATES

मंकीपॉक्सचा पहिला बळी...!

Edited by:
Published on: July 19, 2022 17:56 PM
views 15  views

कोरोनाचा धोका असतानाच आता मंकीपॉक्स या नवीन आजाराने डोकं वर काढलं आहे. मंकीपॉक्समुळं पहिल्या रुग्णाच्या मृत्यूने चिंता वाढली आहे. नायजेरियातील ४० वर्षीय व्यक्तीचा मंकीपॉक्सची लागण झाल्यामुळं मृत्यू झाला आहे. प्रशासनानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

४० वर्षीय रुग्णाचा मंकीपॉक्समुळं मृत्यू झाला आहे. हा रुग्ण शारिरिकदृष्ट्या कमजोर व अनेक व्याधींनी ग्रस्त होता, असंही नायजेरियन आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. नायजेरियामध्ये सप्टेंबर २०१७ मध्ये हा आजाराचा फैलाव झाला नव्हता. २०१७ मधील ३६ राज्यांमधून २२ राज्यांत कमीत कमी २४७ रुग्ण समोर आले आहेत आणि त्यांचा मृत्यूदर ३.६ टक्के इतका आहे.