LIVE UPDATES

डॉ. दिनेश नागवेकर यांना राजदूत पुरस्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: January 01, 2026 12:36 PM
views 758  views

सावंतवाडी : दिल्ली येथील न्यु थिंक फाऊंडेशनने डॉ. दिनेश नागवेकर यांना राष्ट्रीय पातळीवरील राजदूत पुरस्कार देऊन सन्मानित केले. भारतातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या २० व्यक्तींना आयुष मंत्रालयाचे माजी सदस्य संचालक डॉ. दिनेश उपाध्याय आणि उत्तराखंड राज्याचे माजी कॅबिनेट राज्यमंत्री कमल सिंग नेगी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सध्या ज्ञान आहे तर पदवी नाही, पदवी आहे तर ज्ञान नाही, ज्ञान व पदवी आहे तर संस्कार नाहीत अशी स्थिती आहे. आपल्याला देण्यात येणारे पुरस्कार व सन्मान चिन्हे हे शोभेची नाहीत तर आपल्या कार्याचा गौरव आहे. आपल्या कार्यासाठी प्रोत्साहन आहे. आपण ज्या कार्यक्षेत्रात कार्य करत आहात त्यात अधिक वाढ करा आणि समाजासाठी कार्य करा असे आवाहन पुरस्कार प्राप्त व्यक्तींना डॉ. दिनेश उपाध्याय यांनी याप्रसंगी केले.

न्यु थिंक फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनिता देवी आणि कार्यकारी मंडळ यांनी राष्ट्रीय परिषद दिल्ली येथे आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक न्यु थिंक फाऊंडेनचे जनरल सेक्रेटरी विकास शर्मा यांनी केले.

डॉ. दिनेश नागवेकर हे गेली ४५ वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून, इंस्टीट्युट ऑफ इंजिनिअर, इन्स्टीट्युशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर इंस्टिट्युशन ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन बिल्डिंग काँग्रेस अशा स्थापत्य अभियांत्रिकीमधील वीस संस्थाचे आजिवन सदस्य आहेत. तसेच डॉ. नागवेकर सावंतवाडीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष असून, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, दोडामार्ग हायस्कूल, चौकूळ हायस्कूल, उर्दू हायस्कूल, माणगांव हायस्कूल, मांडकुली हायस्कूल, डोंगरपाल हायस्कूल, तळवडे हायस्कूल, ओटवणे हायस्कूल, कोलगांव हायस्कूल, माणगांव ग्रंथालय, भंडारी समाज महिला वसतीगृह अशा संस्थाच्या इमारतीसाठी विना मोबदला मार्गदर्शन केले आहे. डॉ. दिनेश नागवेकर यांना कोकणसादचा 'स्मार्ट लिडर', सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारासह राष्ट्रीय पातळीवरील १४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026