LIVE UPDATES

किल्ले सिंधुदुर्ग येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव शिवराजेश्वर मंदिरामध्ये नवीन सिंहासन बांधकाम केल्यानंतर प्रथमच शिवजयंती सोहळा साजरा
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 19, 2023 12:00 PM
views 640  views

मालवण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग किल्ला याला इतिहासामध्ये अत्यंत महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले शिवराजेश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाचे नवीन बांधकाम केल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला येथे प्रथमच शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुक काढत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते मूर्तीस जिरेटोप आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवे फेटे,  भगवे झेंडे यामुळे किल्ले परिसर भगवमय झाला होता.



दरम्यान, यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गायन सादर करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा यावेळी घेण्यात आली. मालवण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला भव्य भगवा ध्वज देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.



याप्रसंगी आमदार वैभव नाईक, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, शिल्पा खोत, मंदार ओरसकर, भाई कासवकर, अनुष्का गावकर, तळगाव सरपंच लता खोत, मालवण शहर प्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, मालवण महिला आघाडी तालुकाप्रमुख श्वेता सावंत, निनाक्षी शिंदे, महेंद्र माडगूत, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, उमेश मांजरेकर, रणजीत परब, वायरी सरपंच भगवान लुडबे, राजू परब व मालवण तालुक्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026