LIVE UPDATES

कोकणातील कलाकाराची पुण्यातील रसिकांवर मोहिनी

दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या कलेला पुण्यात मिळाली अनोखी दाद
Edited by:
Published on: February 11, 2026 10:10 AM
views 404  views

सावंतवाडी. : कोकणची पारंपरिक लोककला दशावतार सध्या पुण्यातील रसिकांना भुरळ घालत आहे. वर्ल्ड एक्सलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेला दशावतारातील पहिला कलाकार गौरव शिर्के यांची कला पुण्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अर्बनली मीडिया सादर करत असलेल्या आणि सिद्धार्थ मेनन प्रस्तुत चालू असलेल्या दशावतार महानाट्य महोत्सवात,

जय हनुमान दशावतार मंडळाच्या “दख्खनचा राजा जोतीबा माझा” या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान एक आगळावेगळा कलात्मक अनुभव रसिकांना पाहायला मिळाला.

या नाटकात गौरव शिर्के यांनी साकारलेल्या जोतीबा भूमिकेची प्रतिकृती पुण्यातील एका चाहत्याने रांगोळीच्या माध्यमातून साकारली. ही रांगोळी पाहताच उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. पारंपरिक लोककलेला आधुनिक कलात्मक माध्यमाची जोड मिळाल्याने या उपक्रमाला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली.

ही सुंदर रांगोळी गौरेश राऊळ या रांगोळी कलाकाराने साकारली असून, त्यांच्या कलेने पुणेकरांची मने जिंकली. दशावताराच्या परंपरेला मिळालेली ही मानाची दाद कोकणातील लोककलेच्या समृद्ध परंपरेचा अभिमान वाढवणारी ठरत आहे.

कोकणची लोककला, दशावताराची ऊर्जा आणि पुण्याच्या रसिकांची कला-दृष्टी यांचा हा सुंदर संगम दशावतार महोत्सवाला नवे परिमाण देणारा ठरत आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026