LIVE UPDATES

जिल्ह्यात ५ स्टार हॉटेल उभारणीबाबत मंत्रालयात महत्वाची बैठक

सिंधुदुर्गात पर्यटनविकासाला चालना | ५ स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी : मंत्री नितेश राणे
Edited by:
Published on: February 12, 2026 18:49 PM
views 545  views

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी,  असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनविकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026