LIVE UPDATES

मोठी बातमी! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल

काय आहे कारण?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 01, 2023 14:38 PM
views 605  views

मुंबई : खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना 'महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ' असे वक्तव्य करणं महागात पडलं आहे. राऊतांविरोधात विधिमंडळ सभागृहात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. राऊतांना त्यांच वादग्रस्त विधान भोवलं आहे.

संजय राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार विधीमंडळात आक्रमक झाले आहेत. तसेच, मविआमधीलही नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांना यासंदर्भात सहमती दर्शवली होती.


राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सभागृहात जोरदार चर्चा

संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल. संजय राऊतांवर आम्ही हक्कभंग दाखल करत आहोत. असे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितलं तर अजित पवारांनी सहमती दर्शवली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, व्यक्तीला, नागरिकाला अशा प्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर मी ती बातमी बघितली. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत आहे.

राजकारण बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. प्रत्येकानं शिस्त पाळायला हवी. संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण कुणी काहीही बोलायला नको. त्या बातमीत तथ्य आहे का हेही तपासून बघायला हवं. त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय विधिमंडळानं घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026