मालवण : कोळंब खालची वाडी गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोकीच्या बाजूने जात घराच्या परिसरात सर्वत्र बंदुकीच्या शेरे पडलेले दिसून आले आहेत.
दरम्यान गोळीबार करणारी व्यक्ती स्वप्नील शिर्सेकर यांच्या समोरील कंपाऊंड येथून त्याला धक्की मारुन पळून गेला आहे. ज्याठिकाणी हून गोळीबार करण्यात आला त्याठिकाणी बुटांचे ठसे आढळून आले आहेत.
संदीप शेलटकर यांनी हा आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने आपण यातून सुटलो असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले पाहिजे अशी मागणी केली आहे.
गोळीबार झाल्यानंतर संदीप शेलटकर यांच्या घराच्या परिसरात सर्वत्र गोळीचे शेरे पसरलेले होते. किचन रुम, दुचाकी, अंगणात शेरे दिसून आले आहेत. संदीप शेलटकर यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांकडून गोळीबार झालेल्या ठिकाणी आणि उडालेल्या छरे यांची तपासणी करण्यात आली आहे. संदीप शेलटकर यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
ताजी बातमी
View all








