LIVE UPDATES

सिंधुदुर्गात अवैध गॅस वापरावर कारवाईसाठी भरारी पथक सक्रिय

साठेबाजी करणाऱ्यांना कडक इशारा ; जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 10, 2026 20:32 PM
views 600  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली तेल कंपन्यांचे समन्वयक, गॅस वितरक व पेट्रोल पंप डिलर्स यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत इंधन व गॅस साठ्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान BPCL, IOCL आणि HPCL या तीनही तेल कंपन्यांच्या समन्वयकांशी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यात आली.

संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा पुरवठा नियमित आणि सुरळीत सुरू असल्याची माहिती दिली. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असल्याने कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, घरगुती गॅसचा अवैध वापर, साठेबाजी तसेच कृत्रिम दरवाढ रोखण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता व फिरते पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक नियमित तपासणी करून अवैध गॅस वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत काही ठिकाणी गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना ग्रामस्थांकडून अडविण्याचे प्रकार होत असल्याची माहिती गॅस वितरकांनी दिली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या आणि गॅस वितरक यांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकांनी अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026