LIVE UPDATES

कुडाळमध्ये ४ एप्रिल रोजी 'मालवणी अवार्ड २०२६' चा सोहळा

ओमप्रकाश चव्हाण यांना 'कला सिंधू सन्मान' जाहीर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 02, 2026 15:11 PM
views 482  views

कुडाळ : 'सन्मान बोलीभाषेचो, अभिमान मालवणी माणसाचो!' हे ब्रीदवाक्य घेऊन रिल्स मालवणी ग्रुपच्या वतीने शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी 'मालवणी अवार्ड २०२६' या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून, यंदा या सोहळ्याचे चौथे वर्ष आहे.

मालवणी नाट्यसम्राट मच्छिंद्रनाथ कांबळी यांच्या जन्मदिनाचे म्हणजेच 'मालवणी भाषा दिनाचे' औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या पत्रकार परिषदेत रिल्स मालवणी ग्रुपचे अध्यक्ष तुषार तळकटकर आणि सदस्य निलेश गुरव यांनी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

यावर्षीचा मानाचा 'कला सिंधू सन्मान' पुरस्कार दशावतारातील बालगंधर्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या दशावतार कलेतील प्रदीर्घ योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला जाईल.

मागील वर्षभरात मालवणी भाषेत उल्लेखनीय काम करणाऱ्या कलाकारांचा 'मालवणी अवार्ड' देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील श्रेणींचा समावेश आहे:

सर्वोत्कृष्ट मालवणी गीत, चित्रपट आणि वेबसीरीज

सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री व मालवणी कुटुंब

सर्वोत्कृष्ट दशावतार, एकांकिका आणि शॉर्ट फिल्म

मालवणी खाद्यसंस्कृती क्षेत्रात कार्य करणारे कलाकार

'कोकण वाचवा' रिल्स स्पर्धेचा निकाल

पर्यावरण आणि संस्कृती रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'कोकण वाचवा' या विषयावरील रिल्स स्पर्धेचा निकालही याच कार्यक्रमात जाहीर करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, मालवणी बोलीचा आणि कलेचा हा उत्सव अनुभवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रिएटिव्ह हेड तेजस मसके यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विठ्ठल तळवलकर, सदस्य रामचंद्र आईर, पुजा सावंत-उपळेकर, भावेश तळवलकर आणि उपेंद्र पवार उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026