LIVE UPDATES

अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई

सुमारे २२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2026 14:23 PM
views 485  views

सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाका इन्सुली येथे गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे २२ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तपासणी नाका इन्सुली येथे ५ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली. या वाहनातून गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असल्याचे उघड झाले. अधिक तपासणीअंती वाहनात लपवून ठेवलेले विविध प्रकारचे दारू बॉक्स आढळून आले.या कारवाईत एकूण २२,३४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाहनातील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.