LIVE UPDATES

शिरोडा मारहाण प्रकरणातील फरार आरोपी बावळाट येथून ताब्यात

वेंगुर्ला पोलिसांनी सापळा रचून शिताफीने घेतला शोध
Edited by: दिपेश परब
Published on: April 08, 2026 12:12 PM
views 1020  views

वेंगुर्ले : शिरोडा परबवाडा येथील श्रीनाथ उर्फ बबलू विजय परब यांना २६ मार्च २०२६ रोजी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने, लाकडी दांड्याने डोक्यावर मारहाण झाली होती यात परब गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या प्रकरणी समीर हरिश्चंद्र परब यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरोडा खासबागवाडी येथील दर्शन दयानंद गडेकर (२५) व भूषण दयानंद गडेकर (३०) यांच्यावर वेंगुर्ले पोलिसात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. 

 परब यांना मारहाण करून दर्शन व भूषण गडेकर हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यांच्या ठावठिकाण्याबाबत कोणतेही धागेदोरे नसतानाही त्यांचा गोपनिय माहीतीच्या आधारे शोध घेऊन सावंतवाडी बावळाट, खालचीवाडी येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश राठोड, पोलीस हवालदार प्रसाद कदम, पोलीस हवालदार योगेश राऊळ, पोलीस हवालदार स्वप्निल तांबे, पोलीस अंमलदार प्रथमेश पालकर, पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, महिला पोलीस सिंधू मोंगल, महिला पोलीस सलोनी कांबळे, पोलीस स्टाफसह बावळाट खालचीवाडी येथे सापळा रचून दोन्ही फारारी आरोपीत यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांना वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आणुन दिनांक 07/04/2026 रोजी अटक करण्यात आली. 

त्यांना वेंगुर्ले न्यायालयामध्ये हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस कोठडी मिळण्याकरिता सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आरती पवार यांनी युक्तीवाद केला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी करत आहेत.