कणकवली : कणकवली तालुक्यातील ओटव येथील एका वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना घडली होती. या चोरीनंतर संशयीत आरोपी साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २१, रा. वसईरोड, ठाणे), मुकेश महेंद्र पाटणे (वय २८, रा. साईनाथनगर ,विरार) या दोघांनी गुन्हा अन्वेषण शाखेच्या सिंधुदुर्ग पथकाने मुंबई, भाईंदर येथे ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. ती मुदत संपल्याने मंगळवारी त्या दोघांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने ३० एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.
दरम्यान, त्या आरोपींना घेवून पोलिस अधिक तपासासाठी मुंबईला जाणार आहेत. ओटव, ओटववाडी येथील सुवर्णा नारायण रावले (वय ६६) हीच्याकडील सुमारे १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बुधवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास दोघा चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी सुर्वणा रावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साईल रसाळ, मुकेश पाटणे या दोन आरोपींविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यावर कणकवली पोलिसांकडे सुपूर्द केले होते. पोलिसांनी त्यांना. अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. त्यांना २८ एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. ती मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
ताजी बातमी
View all








