LIVE UPDATES

गोकुळची आगामी निवडणूक महायुती एकत्र लढवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णय
Edited by:
Published on: April 30, 2026 18:55 PM
views 289  views

कोल्हापूर : मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. विषय होता गोकुळच्या आगामी निवडणुकीचा. आगामी निवडणूक महायुती म्हणून सर्वजण एक दिलाने आणि एकत्र लढवतील अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आणि त्याला महायुतीमधील सर्वच नेत्यांनी संमती दर्शवली. राज्याच्या सहकार विश्वात आणि दुग्ध क्रांती मध्ये गोकुळचे योगदान आणि स्थान मोठे आहे.

हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या गोकुळची वाटचाल अधिक विकासात्मक आणि जोमाने होण्यासाठी सर्वांनीच सक्रिय रहावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याला महायुतीमधील सर्वच नेत्यांनी सहमती दर्शवली. या बैठकीला नामदार चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे,  गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, संचालिका  शौमिका महाडिक, समित कदम उपस्थित होते. गोकुळची आगामी निवडणूक महायुती म्हणून एकसंघ पद्धतीने लढवली जाईल यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले.

 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026