LIVE UPDATES

DCM एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका

इमर्जन्सी लँडिंगमुळे धोका टळला
Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2026 17:39 PM
views 565  views

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून मुरबाड इथे जात असताना पुन्हा हेलिकॉप्टर जुहू विमानतळावरती आणण्यात आले आहे.


 महालक्ष्मी रेस कोर्स इथून मुरबाड इथे त्यांचं हेलिकॉप्टर जात होतं. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला आणि त्यानंतर प्रिकॉशन म्हणून मुरबाड इथे जात असलेलं हे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा जुहू विमानतळावरती आणण्यात आलेल आहे. काही वेळापूर्वी कल्याण सह ठाण्यासह मुंबईमध्ये देखील अचानक एक वादळ आलं.  धूळ मातीचा लोट अक्षरशः हवेमध्ये उडत होता आणि दृश्यमानता देखील कमी झाली होती. मात्र, त्याच वेळी महालक्ष्मी रेसकोर्स इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका हेलिकॉप्टरने उड्डान घेतली होती. ते एक मुरबाडला येथे एका लग्नासाठी जात होते. यावेळी अचानक मोठा वादळाचा झोत आल्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर इमर्जन्स लँडिंग करावं लागलं.

हेलिकॉप्टर हवेत असताना पुन्हा त्याला माघारी फिरवून जवळ असलेल्या जुहूच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागल. या संपूर्ण प्रकारातून थोडक्यात एकनाथ शिंदे वाचलेले आहेत. सर्वजण अगदी सुरक्षित असून हेलिकॉप्टर विमानतळावर उतरवण्यात आलेल आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026