LIVE UPDATES

सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात

Edited by: विनायक गांवस
Published on: May 09, 2026 23:18 PM
views 255  views

पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या असं आवाहन त्यांनी केलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मागून येणाऱ्या एका गाडीने सुळे यांच्या कारला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत.

अपघाताबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 ने माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत.अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात. मी सर्वांना आवाहन करते की, कृपया सीट बेल्ट वापरा, सावध राहा आणि जबाबदारीने वाहन चालवा जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026