LIVE UPDATES

कणकवली शहरात परप्रांतीय तरुणांनी मुलींना छेडलं

नागरिकांनी बेदम चोपलं | नेमकं काय आहे प्रकरण
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 15, 2026 17:33 PM
views 545  views

कणकवली : शहरात मुलींची छेड काढल्याच्या आरोपावरून दोन परप्रांतीय युवकांना नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकांनी शहरातील काही मुलींशी गैरवर्तन व छेडछाड केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आणि संतप्त जमावाने दोघांना पकडून बेदम मारहाण केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे नंतर जमाव जास्त वाढल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव हे दाखल झाले व यावेळी नागरिकांनी यांना चालत पोलीस ठाण्यात यावे अशी मागणी केली यावेळी काही काळ पोलीस आणि नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलीस व्हॅन मधून बाहेर काढले आणि काही अंतरावर चालत पोलीस गाडीत बसवले. यावेळी स्थानिक नागरिक देखील पोलीस स्थानकात दाखल झाले होते व यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होते. पोलिसांनी संबंधित दोघांना ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.