LIVE UPDATES

आयएनएस 'गुलदार' युद्धनौका समुद्रस्थळी स्थापित !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 19, 2026 18:34 PM
views 838  views

सिंधुदुर्ग : मालवण-वेंगुर्ला जवळील निवती रॉक समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ स्थापित करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या भागाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला, असल्याची माहिती एमटीडीसी कोकण विभाग प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने यांनी दिली. 

श्री. माने म्हणाले, गेली अनेक दिवस आम्ही यासाठी काम करत असून समुद्रातील खवळलेल वातावरण अन् परिस्थितीनुसार आता 'एक्स आयनेस गुलदार' स्थापित झाली आहे. ही युद्धनौका पर्यटकांना पाहण्यासाठी एक ते दीड वर्षात बघायला मिळेल‌. प्रस्तावित पाणबुडीद्वारे ती पाहता येणार असून स्कूबा डायव्हिंगद्वारेही तांत्रिक बाबींचा अभ्यास करून ही युद्धनौका पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पोलंड या देशाची निर्मिती असणारी ही नौका १९८५ मध्ये भारतीय नौदलात सामील झाली. श्रीलंकेत अंदमान-निकोबार बेट इथे चांगल्या प्रकारे कामकाज केल्यानंतर ती निवृत्त झाली. त्यानंतरही ती नौका आता पर्यटनाच्या सेवेत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

८१ मीटर लांब, २२ मीटर उंच आणि १,२०० टन विस्थापन असणारी गुलदार ही युद्धनौका जवळपास २२ मीटर खोलीच्या समुद्रात स्थापित करण्यात आली आहे. गुलदार युद्धनौका दक्षिण दिशेकडे म्हणजे गोव्याच्या दिशेने तोंड करून समुद्रतळाशी स्थापित केली आहे. बुडालेल्या युद्धनौकेचे प्रवाळ बेटात रूपांतर होऊन त्यावर सागरी जीवसृष्टीचा अधिवास नैसर्गिकरीत्या तयार व्हायला साधारणता दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. आज प्रकल्पाच्या पहिल्या भागाचा अंतिम टप्पा पूर्ण झाला असून ही युद्धनौका निवती समुद्रस्थळी झाली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026