LIVE UPDATES

BIG BREAKING | विशाल परब यांचा मुंबईत धमाका !

मातोश्रीच्या अंगणात लावले निलेश राणेंच्या वाढदिवसाचे बॅनर
Edited by: भरत केसरकर
Published on: March 16, 2023 08:48 AM
views 762  views

मुंबई : इलाका तुम्हारा है तो धमाका हमारा है ! आखिर तुम्हारे इलाके मै हमने धमाका कर दिखाया है ! तुमचा इलाका असला तरी आम्ही धमाका करू शकतो, याप्रमाणे भाजपचे युवा नेतृत्व तथा विशाल सेवा फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष विशाल परब यांनी माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भलेमोठे होर्डिंग्ज मुंबईत झळकवले आहेत.


माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्चला आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून विशाल परब यांनी हे भलेमोठे बॅनर मुंबई मध्ये लावले आहेत. विशेषत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हे बॅनर झळकल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मातोश्री व शिवसेना भवनासमोरच हे बॅनर लागले आहेत. त्यामुळे निलेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेले विशाल परब यांनी मातोश्रींच्या अंगणातच पुन्हा एकदा हे बॅनर लावत धमाका केला आहे.




याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन-आशिर्वाद यात्रेत अशाच पद्धतीने बॅनर लावत धमाका केला होता. त्यामुळे विशाल परब हे जोरदार चर्चेत आले होते. आज अशाच पध्दतीने मुंबईसह तळकोकणात निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणारे हजारो बॅनर लावत विशाल परब यांनी एक प्रकारचा धमाका केला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026