कणकवली : गोवा ते मुंबई असा प्रवास करत असलेल्या सुरज विनोद सिंग (२९, अंधेरी पूर्व - मुंबई )याच्या बागेतील महागड्या कॅमेऱ्यासह अन्य साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना महामार्गानजीक नांदगाव येथील हॉटेल ग्रीन फिल्ड येथे ३० मे रोजी घडली.
सुरज खासगी आराम बसने मुंबईला जात होता. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बस नांदगाव येथील हॉटेल ग्रीन फील्ड येथे आराम जेवणासाठी थांबली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरामबस तिथून मार्गस्थ झाली. त्यानंतर सुरज यांनी बॅग पाहीली असता उघडी दिसली. तपासणी केली असता सोनीप्रो कंपनीचा कॅमेरा, लेन्स, बॅटरी, एसडी कार्ड आदी मिळून सात लाखांचे साहित्य चोरीस गेल्याचे आढळले. याबाबत सुरज यांनी अंधेरी येथे चोरीची तक्रार दिली. मात्र घटना कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तपास येथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ताजी बातमी
View all








