LIVE UPDATES

घोटाळ्यातील 'प्रिती'ची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कारागृहात रवाना | मुलाची जबाबदारी स्वीकारली आईने
Edited by: विनायाक गांवस
Published on: June 04, 2026 20:33 PM
views 810  views

सिंधुदुर्ग : शेअर ट्रेडिंग मार्केट कोट्यवधीच्या घोटाळ्यातील सागर कारिवडेकर, प्रिती राणे, सचिन राणे यांच्यापैकी प्रिती राणे हीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीला ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज तीला न्यायालयासमोर हजर केले असता १८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सुमारे १८० ते १८५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोपातील हे संशयित आहेत. शेअर ट्रेडिंगसाठी आमिष दाखवून पैसे गोळा करणाऱ्या प्रिती राणे हीला‌ नुकतीच अटक करण्यात आली होणी. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज प्रीती राणे हीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीला १८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी त्यांना पुन्हा १८ जून रोजी सेशन कोर्टात हजर करण्याचे आदेश दिलेत. तर प्रीती राणेच्या मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्या आई रेखा मोरे यांनी स्वीकारली असून न्यायालयीन आदेशानुसार प्रीती राणे यांना आज कारागृहात रवाना करण्यात येणार आहे.