LIVE UPDATES

तेंडोलीत उद्या ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ संयुक्त दशावतार नाटक

नामवंत कलाकारांची मांदियाळी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 14, 2026 17:53 PM
views 251  views

कुडाळ : तेंडोली ग्रामस्थांच्या वतीने तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिरामध्ये सोमवार, १५ जून रोजी रात्री ठीक ७.३० वाजता ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या काल्पनिक संयुक्त दशावतार नाटकाचे जाहीर आयोजन करण्यात आले आहे. दशावतार क्षेत्रातील दिग्गज आणि निवडक कलाकारांचा समावेश असलेले हे नाटक रसिकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

या संयुक्त दशावतार नाटकात विविध भूमिकांमध्ये खालील नामवंत कलाकार रंगमंच गाजवणार आहेत यात मुख्य भूमिका महागणपती- प्रथमेश मेस्त्री, रिद्धी सिध्दी- सखाराम परब, चंडोल- दामोदर जोशी, आई- सुधीर तांडेल, श्याम- हरिश्चंद्र गांवकर, नवरा- काका कलिंगण, सुंदर- गिरिश राऊळ, कुंदन- संजय पाटील, राजा- संजय वालावलकर, शुभांगी- नितीन घाडी. दशावतारातील भीष्माचार्य यशवंत तेंडोलकर हे आचार्य पदाची धुरा सांभाळतील.

नाटकाला अमोल मोचेमाडकर (हार्मोनियम), सौरभ मेस्त्री (मृदुंग) आणि प्रथमेश गावडे (झांज) यांची उत्कृष्ट संगीत साथ लाभणार आहे.

 वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिराच्या पवित्र प्रांगणात होणाऱ्या या भव्य दशावतार नाटकाचा जिल्ह्यातील सर्व नाट्यरसिकांनी, दशावतार प्रेमींनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन तेंडोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026