LIVE UPDATES

ठाणे ते देवगड नवीन थेट एसटी सुरु करा

आमदार रवींद्र फाटकांची परिवहनमंत्र्यांकडे मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 17:06 PM
views 199  views

मुंबई : कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते देवगड या मार्गावर नवीन थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवींद्र फाटक यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीचे  निवेदन सादर केले.


कोकणातील विद्यार्थी, नोकरी- व्यवसायासाठी मुंबई-ठाणे परिसरात वास्तव्यास असलेले चाकरमानी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी आहे. ठाणे ते देवगड अशी थेट बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून त्याचा मोठा लाभ कोकणवासीयांना मिळणार आहे.

कोकणवासीयांच्या भावना आणि गरजा लक्षात घेऊन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली. जनतेच्या हितासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026