सावंतवाडी : येथील ओटवणे कापईवाडी भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील १ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
ओटवणे कापईवाडी येथील रहिवासी मधुकर चंद्रकांत चव्हाण यांचे घर मंगळवारी दुपारी २ ते संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास बंद होते. याच संधीचा फायदा उठवून अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाच्या बाजूच्या खोलीत ठेवलेली पहार घेतली. या पहारीने मुख्य दरवाजाच्या कुलूपावर जोराचा प्रहार करून ते तोडले आणि घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर चोराने कपाटाजवळच ठेवलेली चावी शोधून काढत कपाटाचे लॉकर उघडून त्यातील १ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
ताजी बातमी
View all








