LIVE UPDATES

आता मालवणी भवन स्थापन करणार

पावसाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंतांची घोषणा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 21:31 PM
views 236  views

  • मंत्री नितेश राणेंनी मानले आभार 

सिंधुदुर्ग : एका वर्षात ८ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असून मालवण येथे मालवणी भवन स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. पावसाळी अधिवेशनात त्यांनी ही घोषणा केली असून यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री श्री. सामंत यांचे आभार मानले आहेत.

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबत घोषणा केली असून बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत असून येत्या एका वर्षात ८ ठिकाणी मराठी विकास केंद्र स्थापन केली जातील. चंद्रपूरमध्ये सुसज्ज केंद्र उभारण्यात येणार आहे.  तसेच पुणे, नाशिक, रत्नागिरी, छ. संभाजी नगर, अमरावती, नागपूर, कोल्हापूर आदी ठिकाणी केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रतिशब्द शोधण्याची समिती देखील ३ महिन्यात जाहीर केली जाणार असून  इतर भाषांतील साहित्य मराठीत भाषांतरित करण्यात येणार आहे. तसेच मराठीची बोली भाषा मालवणी असल्याने मालवण येथे मालवणी भवन देखील बांधले जाणार असून आवश्यक निधी प्राप्त करून दिला जाईल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांनी मालवणी भवनाची केलेल्या घोषणेबद्दल कोकणी जनतेच्यावतीनं त्यांचे आभार मानले. ‌


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026