LIVE UPDATES

आंबेनळीसह प्रमुख घाटांत 24 तास पोलीस गस्त - रुग्णवाहिका सुविधा

मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेंचे आश्वासन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 15:19 PM
views 224  views

मुंबई : आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर राज्य सरकार आता घाट रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत आक्रमक झाले असून, राज्यातील प्रमुख घाट रस्त्यांवर आता २४ तास पोलिसांची गस्त आणि १०८ रुग्णवाहिका तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधानसभेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून झालेल्या अपघाताची माहिती २४ तासांनंतर समोर आली होती, ज्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळू शकली नाही. या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा सदस्य अमिन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. यावेळी सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू आणि अस्लम शेख आदींनी घाट रस्त्यांवरील रस्ता रुंदीकरण, संरक्षक कठडे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या अभावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.


या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले की, आंबेनळी घाटातील २४.२ किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून ‘हायब्रीड अ‍ॅन्यूइटी’ (HAM) योजनेअंतर्गत वेगाने सुरू आहे. जरी राज्य मार्गावरील घाट रस्त्यांवर रुग्णवाहिका तैनात करण्याची अशी विशिष्ट तरतूद नसली, तरीही अपघात प्रवण क्षेत्रांचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने नवीन धोरण आखले आहे. त्यानुसार, आता राज्याच्या प्रमुख घाट परिसरांमध्ये १०८ रुग्णवाहिका आणि पोलीस गस्त २४ तास उपलब्ध राहील, जेणेकरून अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून जीवितहानी टाळता येईल, असे त्यांनी नमूद केले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026