LIVE UPDATES

गणपती ते दशावतार

कोकणचा चेडू तन्वी मुंडलेने सांगितल्या आठवणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 12:15 PM
views 246  views

  • कुडाळची कन्या पुन्हा एकदा झळकणार मालिकेच्या पडद्यावर 
  • शाल्व किंजवडेकरसोबत रंगणार अनोखी प्रेमकथा 

चिपळूण : कोकणातल्या माझ्या आठवणी या सांगू तितक्या कमीच आहेत मी कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची,कोकण म्हणजे माझ्यासाठी खास आहे स्पेशल आहे. त्यामुळे इतक्या आठवणी आहेत की मी अजूनही गावी जात असते माझं घर तिकडे आहे. गणेशोत्सवाचे वेध आम्हाला आतापासूनच लागले आहेत. गावी जायला प्रवासाचं बुकिंग पटकन मिळत नाही. कारण सगळेच कोकणात गावी येतात म्हणून मी फ्लाईटचे बुकिंग आतापासून बघत आहे मला गावी कसं जायला मिळेल यासाठी दरवर्षी आम्ही गणेशोत्सवात, दिवाळी, दसरा, शिंमगोत्सवात या सगळ्यांसाठी आम्ही कोकणात जातो मी लहानाची मोठी कोकणात झाले. अशा कोकणातल्या अनेक आठवणी सुपरहिट युवा अभिनेत्री  तन्वी मुंडले हिने कोकण दौऱ्यावर असताना खास संवाद साधताना सांगितल्या आहेत.  स्टार प्रवाह वाहिनीवरील 27 जून पासून नव्याने सुरू होणाऱ्या कोकणातील आगळ्यावेगळ्या प्रेम कथेवर साकारलेली "विसरू नको मला" या मालिकेच्या प्रोमोसाठी तन्वी मुंडले, शाल्व किंजवडेकर हे मुख्य कलाकार कोकण दौऱ्यावर आले होते.



कोकण म्हणजे माझ्यासाठी स्पेशल आहे. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर श्री कुडाळेश्वराचे मंदिर आहे जे आमचे ग्रामदैवत आहे. तिथे खूप सगळे उत्सव प्रत्येक सण हे साजरे केले जातात त्याची आस आम्हाला वर्षभर लागून राहिलेली असते. श्रीराम नवमीचा उत्सव हा मोठा असतो हा उत्सव येणार आणि मग देवळळात आठ दिवस भरगच्च कार्यक्रम असा सगळा थाट असतो. लहानपणी तीच मजा असते आपण बाप्पाचे दर्शन तर घेतोच पण एक्साईटमेंट असते ती देवळात होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांची , आपल्याला मिरवायला मिळणार याचीही उत्सुकता असायची अशी लहानपणी आम्ही मजा मस्ती खूप केली आहे. आता कामामुळे गावी जाणं फार  होत नाही पण तरीही वेळ मिळेल तेव्हा तेव्हा कोकणात आवर्जून जाते.पण कोकण हे माझं मूळ आहे आणि ते माझ्यापासून कधीही लांब झालं नाही आणि मी ते कधी होऊही देणार नाही, कोकण हे माझ्यासाठी जवळच आहे आणि ते कायम राहील. प्रत्येक क्षणाला गावी जाणं होतं आमचे एकत्रित कुटुंब आहे त्यामुळे सगळे सण हे लहानपणापासून मी एकत्रित साजरे केले आहेत. त्यामुळे कोकणातली एक अशी आठवण नाही सांगू शकत पण मी जी काही आजवर घडले ते या सगळ्यांचे मिळून आहे.

लहानपणी तू पाहिलेल कोकण आणि आताच कोकण काय फरक वाटतो का तर त्यावर तन्वी म्हणाले की आता खूपच सुख सोयी आल्या आहेत. माझ्या लहानपणी खूप छोटंसं गाव होतं आता शहरीकरण झाल आहे कोणतेही छान आहे. पण आजही कोकणातील माणसांमधील आपुलकी प्रेम जे आहे तेच आहे माणसं तीच आहेत अशा प्रेमळ आठवणी तिने सांगितल्या.

आमचं पाच सहा वर्षांपूर्वी जुनं घर होतं ते आता आम्ही नवीन बांधले आहे. जुन्या घरातील खूप आठवणी आहेत ते स्मरणात आहे. लहानपणी अभिनेत्री होण्याआधी तन्वी होती तीच मी आजही आहे त्यामुळे मला घरच्या लोकांना सांगायला लागतं अग तू अॅक्टर आहेस तू जरा असं राहा पण ते मला नाही जमत शेवटी आपली माती आपली नाळ हे घट्ट जोडलेली असते असा मनमोकळा संवाद तिने यावेळी साधला. आमचं जुनं घर आजही मातीने सारवलेलं खूप साऱ्या खोल्या पुढे सरवलेले अंगण असा थाट आजही आहे.

बाप्पाची शाडू मूर्तीची आठवण पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कोकणात गणपती जाऊन सांगण्याची पद्धत असते एक दीड महिना आधी आम्ही जाऊन गणपती सांगतो शाडू मातीची मूर्ती असल्यामुळे आपल्याला कोणती मूर्ती हवी आहे काय मापात पाहिजे देव्हाऱ्यातला असतो आमच्या गणपती त्यामुळे आम्ही दरवर्षी जाऊन सांगतो आम्हाला बाप्पाची मूर्ती कशी हवी आहे त्यामुळे ही प्रथा परंपरा आहे आम्हीही वर्षांवर्षी जपली आहे यापुढेही जपत राहू असं सांगत. शाडू मातीच्या गणेश मूर्तीची दरवर्षीची आठवण सांगत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही तन्वी हीने दिला आहे.

दशावतार लोककला व बोलीभाषा याचा अभिमान

कोकणातील लोककला प्रकारच्या दशावतार हा आजही आमच्या कोकणात लोकप्रिय आहे तुफान गर्दी असते. खूप मोठे कलावंत या लोककलेतून झाले आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही दशावतारचा सीन शूट केला. त्यावेळेला आम्हाला उत्तम कलाकारांचे मार्गदर्शन मिळालं की ज्यांनी रंगभूषा वेशभूषा कशी करायची हे आम्हाला दाखवलं ही लोककला या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात राहील असा विश्वास तिने व्यक्त केला. कोकणातील संगमेश्वरी बोलीभाषा, मालवणी बोलीभाषा या अलीकडे मालिकांमधून पुढे येत आहेत याबद्दल विचारता ती म्हणाली याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे काही किलोमीटरवर गेल्यावर बोलीभाषा बदलते. मालवणी भाषेतही खूप व्हर्जन आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारातील बोलीभाषा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि हे चांगलं काम घडतं आहे. मालिकांमुळे घराघरात आपल्या बोलीभाषा पोहोचत आहेत. त्या जपल्या पाहिजेत या सगळ्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असं दिलखुलास मत तिने यावेळी व्यक्त केलं.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026