LIVE UPDATES

सिंधुपुत्र हर्ष नकाशे 'सम्राट संगीत सितारा' चा मानकरी

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 27, 2026 16:42 PM
views 266  views

सावंतवाडी : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट-१ आयोजित व सम्राट क्लब माशेल यजमान असलेल्या 'सम्राट संगीत सितारा २०२६' या गोव्याच्या प्रतिष्ठित हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा द्विदशकपूर्ती वर्षाचा ग्रँड फिनाले दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, कला अकादमी-पणजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हर्ष संजय नकाशे याने प्रथम क्रमांक पटकावून 'सम्राट संगीत सितारा २०२६' चा बहुमान मिळवला.

गेली २० वर्षे शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य या स्पर्धेने यशस्वीरित्या केले आहे. चार प्राथमिक फेऱ्या आणि उपांत्य फेरीतून निवड झालेल्या सहा अंतिम स्पर्धकांनी अंतिम फेरीत आपल्या गायन कौशल्याची अप्रतिम छाप पाडली. स्पर्धेचे अंतिम निकाल:

प्रथम क्रमांक हर्ष संजय नकाशे (महाराष्ट्र), द्वितीय क्रमांक: पुतराज वेंकटपूरमठ (गदग, कर्नाटक), तृतीय क्रमांक: मल्हार बाळकृष्ण मराठे (सांगे-गोवा) यांनी पटकावला.

 

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पं. राम देशपांडे हे महागुरू व विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर उपस्थित होते. स्पर्धा संपल्यानंतर महागुरू पंडित राम देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाला सम्राट क्लबचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सम्राट संदीप निगळ्ये, राज्य १ चे अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी, सचिव सम्राट विनोद मळीक, कोषाध्यक्ष सम्राट सुबोध रामनाथकर, आणि यजमान मार्सेल क्लबचे अध्यक्ष सम्राट रोहन घाडी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याला सम्राट क्लब आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने

सम्राट संदीप निगळ्ये (आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल) सम्राट शशिकांत पुनाजी (अध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १,सम्राट विनोद मळीक (सचिव, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १,सम्राट सुबोध रामनाथकर (कोषाध्यक्ष, सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १,सम्राट रोहन घाडी (अध्यक्ष, यजमान क्लब - सम्राट क्लब मार्शेल),नरेश पेडणेकर (अध्यक्ष, मये क्लब), मंगेश गांवकर आणि सौ. स्वप्ना मातोंडकर आदी उपस्थित होते. या सोहळ्याचे औचित्य साधून संस्थेच्या उभारणीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये संस्थापक सम्राट सागर पानवेलकर, अक्षय खांडेपारकर, प्रसाद नाईक, योगेश हिरवे, भालचंद्र नाईक, दीपक टिळवे, गुरूदास नाटेकर, दीपक नार्वेकर, राजश्री खांडेपारकर, अविन नाईक, प्रसाद प्रभूगांवकर, अमोल फडते वेतकीकर, ॲड. अवधूत सलतकी, मंगेश गांवकर, अवधूत नाईक, पंकज नमशीकर, भालचंद्र नार्वेकर, अर्चना सिनारे, निखिल साळगांवकर आणि स्वप्ना मातोंडकर यांचा समावेश होता. तसेच अनेक मान्यवर, संगीतप्रेमी, शिक्षक व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026