देवगड : तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रोहित नारायण कदम (वय २२, रा. कसाल बौद्धवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दि. २ जुलै रोजी पहाटे २ ते २.३० वा.दरम्यान मुणगे येथे जिल्हा बँकेसमोर रस्त्यावरील पोलवर लावलेला हा बॅनर पडल्याने रोहित कदम हे तो पुन्हा टेम्पोमध्ये भरत असताना संशयित मनोज सावंत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी इतरांना घटनास्थळी बोलावून घेवून एकत्र येवून त्यांना हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.तसेच फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.या फिर्यादीवरून पोलिसांनी मनोज सावंत, प्रमोद वळंजु, राहुल वळंजु, छोटू सावंत, गणेश गावकर व अन्य एक अशा सहाजणांविरूध्द अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(आर), ३(१)(एस्), ३(२)(व्हीए) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), १८९(२), १९०, ३२४(२), ३५१(२)(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अप्पर पोलिस अधिक्षक नयोमी साटम करीत आहेत.
ताजी बातमी
View all








