सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमधून महागडी सायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. सायकल चोरीला जाऊन अनेक दिवस उलटूनही तिचा शोध लागलेला नसल्याने संबंधित सायकलमालक अलिशा अमोल माणगावकर यांनी सावंतवाडी पोलिसांकडे लेखी तक्रार देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तसेच सायकलबाबत माहिती देणाऱ्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
खासकीवाडा येथील रहिवासी अलिशा अमोल माणगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जून 2026 नंतर त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमधून त्यांची सायकल चोरीला गेली. याप्रकरणी त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्यापही सायकलचा शोध लागलेला नाही.
चोरीला गेलेली सायकल TRIBAN या ब्रँडची असून तिचा रंग सिल्व्हर आहे. ही सायकल कोणाला आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 8862080110 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपयुक्त माहिती देणाऱ्या व्यक्तीस 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचेही माणगावकर यांनी जाहीर केले आहे.
ताजी बातमी
View all








