LIVE UPDATES

'आरोग्यसंपन्न वारी' ॲपचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

वारीतील आरोग्य सेवा, आपत्कालीन मदत आणि अत्यावश्यक सुविधांची माहिती एका क्लिकवर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 09, 2026 22:23 PM
views 296  views

सिंधुदुर्गनगरी : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने विकसित केलेल्या 'आरोग्यसंपन्न वारी' या विशेष डिजिटल ॲप्लिकेशनचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, देवळी-पुळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, "आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, सेवा आणि समतेची परंपरा आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची जबाबदारी लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले 'आरोग्यसंपन्न वारी' ॲप वारकऱ्यांसाठी विश्वासार्ह डिजिटल सहप्रवासी ठरेल. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळण्यासोबतच वारीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध होण्यास या ॲपची मोठी मदत होईल."

या ॲपच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा, डॉक्टरांची माहिती, आरोग्य केंद्रे, 'आपला दवाखाना', पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्वच्छतागृहे, चरण सेवा केंद्र, हिरकणी कक्ष, मुक्काम व विसावा स्थळे तसेच महत्त्वाचे संपर्क क्रमांक यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वारकरी भाविकांना आवश्यक आरोग्य सुविधा अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळणार आहेत.

राज्य शासनाच्या डिजिटल आरोग्यसेवा आणि नागरिककेंद्रित प्रशासनाच्या धोरणाला बळकटी देणारा हा महत्त्वाचा उपक्रम असून, आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले.

वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी भाविकांनी 'आरोग्यसंपन्न वारी' ॲपचा वापर करून उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी केले.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026