LIVE UPDATES

बाळासाहेब, वाजपेयींना जे जमलं नाही ते आम्ही केलं

मोठेपणाच्या ओघात तानाजी सावंत यांचं धाडसी वक्तव्य
Edited by: ब्युरो
Published on: March 29, 2023 11:04 AM
views 742  views

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलं आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे. कारण बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे त्यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही त्या पंढरपूरमध्ये या सावंत बंधूनी 7 लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली अशी दर्पोक्ती एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी करत सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप, शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहेत? हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026