LIVE UPDATES

NCMC Card : एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

नागरिकांना दिलासा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 30, 2026 14:08 PM
views 1726  views
#kokansadlive#news update#konkan update#NCMC Card#st

मुंबई : एसटीचे एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी सुरुवातीला १ ऑगस्टपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती परंतु ,आता राज्य सरकारने यात बदल करून एक महिन्याची मुदत वाढवली आहे. नागरिकांना आता १ सप्टेंबरपर्यंत वेळ मिळणार असून अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण आहे त्या प्रवाशांना आता एनसीएमसी कार्ड मिळवण्यासाठी अवधी मिळणार आहे .अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि अन्य सवलतधारकांना अद्याप ‘एनसीएमसी’ कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. 

कोणत्या योजनांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक

एसटी प्रवासात सवलतींसाठी सध्या अनेक योजना सुरू आहे. त्यापौकी महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी ५० टक्के सवलत, ६५-७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्त १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत पास या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026