LIVE UPDATES

‘रील चॅलेंज २०२६’ स्पर्धेचं आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 14, 2026 15:26 PM
views 241  views

मुंबई : स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन (२० ऑगस्ट) यानिमित्त विवेक जागर संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती  मुंबई जिल्हा  यांच्या वतीने ‘रील चॅलेंज २०२६’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या डिजिटल युगातील तरुणाईच्या सर्जनशीलतेला आणि सामाजिक विचारांना व्यासपीठ मिळावे, तसेच लोकशाही, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी मूल्यांचा प्रसार व्हावा, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी ६० सेकंदांपर्यंतची एक रील तयार करून सादर करायची आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून रील मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येईल. एका व्यक्तीला एकाच रीलद्वारे सहभागी होता येणार आहे. 

स्पर्धेसाठी लोकशाही, Gen Z's India, वैज्ञानिक दृष्टिकोन, Humanity Against Violence तसेच ‘पढेगा इंडिया... तभी बढ़ेगा इंडिया’ हे विषय देण्यात आले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना *सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुस्तके अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी रील ९ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पाठवायची आहे. रीलची कमाल वेळ ६० सेकंद असावी. रीलमध्ये कोणत्याही धर्म, जात, भाषा, प्रदेश किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष अथवा आक्षेपार्ह मजकूर नसावा. स्पर्धेसाठी प्रवेश व अधिक माहितीसाठी *प्रवीण – ८२८६६४४५०४, संदेश – ९१६७५९१७९५ आणि विश्वजीत – ९८१९९४७०१४* या क्रमांकांवर संपर्क साधावा.

“Shoot. Create. Share. तुमचा विचार. तुमची Reel. तुमचा Impact.” या संकल्पनेतून तरुणांनी सामाजिक आशय असलेले सर्जनशील डिजिटल कंटेंट तयार करून या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026