LIVE UPDATES

'ग्रीन एनर्जी हब'च्या माध्यमातून कोकणात निर्माण होणार 50 हजारांहून अधिक रोजगार

Konkan Green Energy Hub : विविध महत्वकांशी हरित उर्जा प्रकल्पांमुळे 50 हजारांहून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार कोकणात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील स्थानिक तरुणांना रोजगाराजी संधी निर्माण होणार आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 25, 2026 13:25 PM
views 307  views
Konkan Green Energy Hub renewable energy project

मुंबई : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन आणि महाराष्ट्राच्या हरित उर्जा धोरण 2023 यांच्या माध्यमातून आता कोकण किनारपट्टी हरित उर्जेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विविध महत्वकांशी हरित उर्जा प्रकल्पांमुळे 50 हजारांहून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार कोकणात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील स्थानिक तरुणांना रोजगाराजी संधी निर्माण होणार आहे.

येत्या तीन ते पाच वर्षांत विविध उर्जा प्रकल्पांची उभारणी होणार आहे. हरित उर्जा धोरणाअंतर्गत सरकारच्या माध्यमातून कोकणात 2.76 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले असून गुंतवणूकीमुळे सुमारे 64 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यात कुशल-अर्धकुशल मनुष्यबळासाठी प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.

पुणे, मुंबईसारख्या शहराकडे काम करणाऱ्या कोकणातील स्थानिक तरुणांना कोकणातच रोजगाराच्या संधी मिळाल्यामुळे तरुणांचे स्थलांतर कमी करण्यासाठी प्रकल्प महत्वाचे ठरणार असून कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यात सिंधुदुर्गमध्ये सागरी वारे व सौर उर्जा प्रकल्प 8 हजार कोटी नैसर्गिक स्त्रोतांपासून अक्षय उर्जा निर्मितीवर भर, रत्नागिरीमध्ये ग्रीन हायड्रोजन व अमोनिया प्लांटद्वारे 40,000 कोटी समुद्राच्या पाण्याचे शुध्दीकरण करुन इलेक्टोलिसिसद्वारे हायड्रोजनची निर्मिती, रायगडमध्ये ग्रीन हायड्रोजन पोर्ट हब तसेच दिघी पोर्टमध्ये  20,000 कोटींची गुतवणूक करुन सागरी वाहतूकीद्वारे आंतरराष्ट्रीय निर्यातीची थेट सुविधा तयार करण्यात येणार आहे. असे प्रकल्प प्रस्तावित असल्याची माहिती प्राप्त होत आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026