LIVE UPDATES

Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 01, 2026 18:47 PM
views 367  views
Sindhudurg ZP Teacher Recruitment

सिंधुदुर्गनगरी : पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रिये अंतर्गत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत निवड झालेल्या (मुलाखती शिवाय) उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. शिक्षक सेवक आणि शिक्षक पदासाठी गुणवत्तेनुसार निवड/शिफारस यादी जाहीर करण्यात आली आहे. 

सर्व संबंधित उमेदवारांनी मूळ कागदपत्रे घेऊन पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कागदपत्र पडताळणी ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कार्यालयात होणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टल प्रणालीत अपलोड केलेली सर्व मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या एक संच स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती, ४ पासपोर्ट साइज फोटो आणावेत. तसेच, सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर विहित ठिकाणी स्वाक्षरी करून कागदपत्रांसह उपस्थित राहावे, त्याच दिवशी समुपदेशनाबाबत तारीख कळविण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेत नोकरीची संधी! ६७ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया
August 28, 2026