LIVE UPDATES

Mumbai Sawantwadi Express : 3 सप्टेंबरपासून दैनिक एक्सप्रेस कोकणवासियांच्या सेवेत

केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून होणार मार्गस्थ : सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज धावणार एक्सप्रेस
Edited by: Rajat Sawant
Published on: September 02, 2026 15:50 PM
views 4362  views
Konkan Railway Dainik Express train September 3

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वेगाडी 3 सप्टेंबरपासून धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवून ही एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ होणार आहे. यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना नवा थेट आणि सोयिस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

नवीन दैनिक एक्स्प्रेसच्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान दैनिक एक्सप्रेस गाडी क्रमांक १५०८७ आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दरम्यान दररोज धावणार आहे. 

'या' स्थानकांवर थांबा

व्यापारी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नागरिक आणि स्थानिक हजारो प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी तसेच कोकणात येण्यासाठी दैनिक एक्सप्रेसचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026