LIVE UPDATES

‘स्वामीराया’ नाटकामुळे स्वामीभक्तीची ओढ निर्माण होईल : महेश इंगळे

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 06, 2026 17:41 PM
views 74  views

देवगड : ‘स्वामीराया’ या नाटकामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारकार्याची महिमा आणि भक्तांना आलेली प्रचिती घराघरात पोहोचेल. या नाटकाच्या माध्यमातून साऱ्याच भाविकांना स्वामीभक्तीची ओढ निर्माण होईल, असे प्रतिपादन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे ‘स्वामीराया’ या मराठी नाटकाचा भक्तिप्रयोग सादर करण्यात आला. या भक्तिप्रयोगाचे उद्घाटन नगरसेवक महेश कल्याणराव इंगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी स्वामींची आरतीही करण्यात आली. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी, “स्वामी कृपा कायम राहावी, या करीता या नाटकाचे औचित्य साधून या गुणी कलाकारांनी स्वामींच्या जीवनकार्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला आहे,” असे सांगितले.

याप्रसंगी अखिलकोट वटवृक्ष निवासी स्वामींचे कृपावस्त्र देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, आ. गणेश गाडगीळ, दिनकर तात्या पाटील, विजय पाटील, डॉ. रविंद्र पाटील, सुनील हुद्दरे बंधू, डॉ. राजू मलंग, प्रा. शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, अंकुश केत, सुनील रणशिंगे, डॉ. विश्व परतुरे, सौरेभ माणगावकर, स्वामीनाथ मुसळे, धीरज कलशेट्टी, संतोष भुजंगे आदी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026