LIVE UPDATES

Ganpati Special Trains 2026 : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार 34 स्पेशल गाड्या, पहा वेळापत्रक

Konkan Railway Ganpati Special Trains 2026 : चाकरमानी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 34 अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 4 आरक्षित विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान तसेच ३० अनारक्षित मेमू पनवेल आणि चिपळूण दरम्यान धावणार आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 07, 2026 17:50 PM
views 372  views
Konkan Railway Ganpati Special Trains 2026

मुंबई : येत्या काही दिवसांतच गणेशाचे आगमन होणार असून मुंबईतील चाकरमानी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दाखल होणार आहे. यावेळी चाकरमानी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 34 अतिरिक्त रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 4 आरक्षित विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान तसेच ३० अनारक्षित मेमू पनवेल आणि चिपळूण दरम्यान धावणार आहेत.

4 आरक्षित विशेष गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०१००३ ही विशेष गाडी १६ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव या मार्गावर धावणार असून एलटीटीवरुन ही गाडी सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि रात्री २३.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर दुसरी ०१००४ विशेष गाडी मडगाव येथून १५ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी १६ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

'या' स्थानकांवर थांबा

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.

मेमू अनारक्षित विशेष गाडी

१० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत गाडी क्रमांक ०११५९ मेमू अनारक्षित विशेष गाडी पनवेल येथून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. तर १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत ०११६० मेमू अनारक्षित विशेष गाडी चिपळूण येथून सकाळी ९ वाजता सुटेल आणि दुपारी १४.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.

'या' स्थानकांवर थांबा

या गाडीला पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनि हे थांबे देण्यात आले आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026