
देवगड : महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत देवगड तालुक्यातील इळये गावचा विद्यार्थी कु. गणेश रमेश ठुकरुल याने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्याचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष मयेकर, इळये शाखाध्यक्ष किशोर ठुकरुल, विशाल ठुकरुल, अप्पा घाडी तसेच ठुकरुल कुटुंबीय उपस्थित होते.
गणेशच्या यशासाठी मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकवृंदांचे तसेच त्याच्या आई-वडिलांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.








