LIVE UPDATES

SSPM इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 20 मे ला भव्य रोजगार मेळावा

जस्ट डायल कंपनीत 100 युवकांना जॉबची संधी
Edited by: समीर सावंत
Published on: May 17, 2023 19:24 PM
views 501  views

कणकवली : एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय , कणकवली आणि जस्ट डायल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे सकाळी ठीक ११.०० वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुलाखतीसाठी जस्ट डायल कंपनी येणार असून किमान १०० युवकांना रोजगार संधी प्राप्त होण्याची संधी एस एस पी एम इंजिनिअरींग काँलेज, कणकवलीने  उपलब्ध करून दिली आहे.


या मुलाखतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त  विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावयाचा आहे मुलाखतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असणार आहे विद्यार्थी हा ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट (PGDM, PGDBM, MBA, BBA, BCom, BSC, BA, BTech or BE )असला पाहिजे तसेच अंतिम वर्ष ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी पण मुलाखतीसाठी  उपस्थित रहु शकतात.  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिना वीस हजार ते 25 हजार पर्यंत सॅलरी ऑफर दिली जाऊ शकते.


मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जसे बायोडाटा,गुणपत्रक,आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आपल्याबरोबर घेऊन यायची आहेत.

संस्थेचे सचिव माननीय आमदार श्री नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या संधीचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण व होतकरू विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी विनंती केली आहे.

रजिस्ट्रेशन लिंक

https://forms.gle/Qqe1EFH4wH5Kxe5j9


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026