LIVE UPDATES

स्वच्छ - सुंदर दोडामार्ग मिशनला आता न.पं.च्या RRR सेंटरची जोड

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते झाला शुभारंभ
Edited by: संदीप देसाई
Published on: May 24, 2023 18:53 PM
views 690  views

दोडामार्ग  : स्वच्छ सुंदर कसई-दोडामार्ग शहरासाठी नगरवासियानी नगरपंचायत ने सुरू केलेल्या आरआरआर सेंटरचा पुरेपूर वापर करून नगरपंचायत ला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केलं आहे

“मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर” RRR Center ( रिड्यूस, रियुज आणि रिसायकल ) अभियान अंतर्गत कसई-दोडामार्ग शहरवासियांसाठी नगरपंचायतीने स्वच्छतेत एक पाऊल पुढे टाकत या सेंटर ची सुरवात केली आहे. घरामध्ये असलेल्या जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तके, कपडे, जुने चपल-बूट, इलेक्ट्रिक वस्तू इत्यादी वापरण्यास योग्य साहित्य/वस्तू नगरपंचायतने सुरू केलेल्या RRR Center (Reduce, Recycle, Reuse) येथे जमा करता येणार असल्याने शहरातील अशा कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागणार आहे. इतकचं नव्हे तर नागरीकांमार्फत "RRR Center" मध्ये जमा करण्यात येणारे साहित्य हे गरजू लोकांनाही देण्यात येणार आहे.  अशा अभिनव सेंटरची सुरवात कसई-दोडामार्ग नगरपंचायत कार्यालयाजवळ बुधवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरिकर, महिला बालकल्याण सभापती ज्योती जाधव क्रांती जाधव, रामचंद्र मणेरिकर, प्रशासन व्यवस्थापक प्रकाश पाटील, संजय शिरोडकर पदाधिकारी, कर्मचारी व शहरातील नागरिक श्रीगणेश गावडे व इतर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

हे सेंटर दि.२४/०५/२०२३ ते दि.२९/०५/२०२३ रोजी सकाळी ०९.०० ते सांयकाळी ०५.०० पर्यत चालू राहणार असून त्यानंतर हे सेंटर कसई-दोडामार्ग प्रोसेसिंग साईट स्मशानभूमी शेजारी चालू राहील. तरी या अभियान आणि कार्यक्रमासाठी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आपल शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सहकार्य करून देशाचे सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात रुजवीलेली स्वच्छता चळवळ आपल्या शहरातही अधिक जोमाने व्यापक बनेल असा विश्वास व्यक्त केला. 



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026