LIVE UPDATES

महाविकास आघाडीत मोठी फूट ; शिंदे गटाच्या मंत्र्यांचा गौप्यस्फोट

.. त्यांचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 31, 2023 21:19 PM
views 497  views

ब्युरो न्युज : ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाने शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाईंनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.


ठाकरे गटाने केलेल्या दाव्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिंदे गटात मोठी फूट ही त्यांची शंभरावी खोटी माहिती आहे. त्यांचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो, आम्ही चांगले काम करत आहोत हे त्यांना बघवत नाही. तसेच महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा देसाई यांनी केला. 


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी अंधारे यांनी केलेल्या तक्ररीची चौकशी करुन शिरसाट यांना क्लीन चीट दिली आहे. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिरसाट यांच्याबाबतीत योग्य ती चौकशी झाली आणि खरं ते समोर आलं. भाजप आणि आमच्यात चांगल्या पद्धतीनं समन्वय असल्याचंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं.


यावेळी ठाकरे गटावर हल्लाबोल करताना शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही चांगले काम करतो हे त्यांना बघवत नाही.‘शासन आपल्या दारी’ या क्रार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते हे करु शकले नाहीत, त्यामुळे लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. त्यांना राज्याशी काहीही देणं-घेणं नसल्याचेही शंभूराज देसाई म्हणाले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026