LIVE UPDATES

डिजिटल मिडियाचे पहिले अधिवेशन 29 ला महाबळेश्वर भिलार इथं !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती | पालकमंत्री शंभूराजे देसाई स्वागताध्यक्ष
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 17, 2022 07:55 AM
views 624  views

सिंधुदुर्ग : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री शंभूराजे देसाई तर कार्याध्यक्ष माजी राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील हे आहेत.

     या अधिवेशनाचे संयोजकपद  संघटनेच्या सातारा जिल्हा शाखेने स्वीकारले असून महाबळेश्वर अधिवेशनाच्या नियोजनाची बैठक काल सातारा शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव सचिन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम ,तुषार तपासे, ओंकार कदम, संतोष नलवडे, नितीन ढापरे, प्रमोद तोडकर, संतोष शिराळे ,बापूसाहेब वाघ, राहुल ताटे -पाटील ,स्वप्नील गव्हाळे, मृणाल देवकुळे, महेश चव्हाण, संजय कारंडे, मदन जांभळे, गणेश बोतालजी , नवनाथ पवार, सुहास कांबळे, अमोल टकले, सागर दंडवते, सोहेल मुलाणी, सूर्यप्रताप कांबळे, प्रशांत बाजी, संदीप, दीक्षित, प्रकाश वायदंडे, ललित लोखंडे, जावेद खान, सुनील रणदिवे, सोमनाथ साखरे हे सभासद उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026